मुरुड:-मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण मुंबई-लोअर परेल येथून आपल्या मित्रांसोबत फिरायला आला होता. पोहायला उतरला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली.
मुंबई लोअर परेल येथे राहणाऱ्या दहा जणांचा चमू मंगळवार 28 मे रोजी सायंकाळच्या सुमारास काशिद समुद्रकिनारी फिरावयास आला होता. येथे आल्यानंतर यातील काही जणांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरला नाही. ते नवीन जेट्टी विकसित होत असलेल्या भागात पोहण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र, 17 वर्षीय ऋषभ दास याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. यापैकी काही जण कसेबसे पाण्याबाहेर निघाले, परंतु ऋषभ हा काही कळायच्या आतच पाण्यात बुडाला. त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु काही तासानंतर तो सापडला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
मुरुड समुद्रात पोहण्यासाठी आलेल्या मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू
