चिपळूण – येथील जेष्ठ नागरिक संघातील कार्यकारणी सदस्यांची टूर चिवेली बंदर येथे नेण्यात आली. त्यावेळी एक तासाचे बोटिंगचा आनंद सर्वानी उपभोगला व बोटीतच चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी कोकणातील निसर्गरम्य वातावरण पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला. कोकणात पर्यटणाला खूप वाव आहे. याकडे अभ्यासपूर्ण दृष्टीं ठेऊन नियोजन केल्यास येथील तरुणाला रोजगार उपलब्ध होण्याची संधी आहे. या वेळी अचानक मराठी मालिका चला हवा येऊ द्या मधील कलाकार कुशल बद्रिके सुद्धा आपल्या कुटुंबियांना घेऊन सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आले व त्यांची भेट झाली. या टूरमध्ये एकूण पंधरा सदस्य सहभागी झाले. अध्यक्ष उस्मान बांगी, उपाध्यक्ष सुरेश जाधव, कोषाध्यक्ष विजय बापट व सचिव रत्नमाला कलम्बटे यानी कार्यक्रमाचे नियोजन केले. व सर्व सामील सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
चिपळूण जेष्ठ नागरिक संघातील कार्यकारणी सदस्यांची चिवेली बंदरावर टूर
