चिपळूण:-शिवभक्त कोकण व निलक्रियेटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मी कोकणी उद्योजक’ व्यावसायिक सन्मान सोहळा मुंबईतील साहित्य संघ नाट्यगृहात मोठ्या उत्साहात झाला. या सोहळ्यात वाशिष्ठी मिल्क ऍण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चा गौरव करण्यात आला. वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी हा सन्मान स्वीकारला.
यावेळी व्यासपीठावर सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष युयूत्सु आर्ते, राष्ट्रपती पारितोषिक विजेते दिग्दर्शक रमेश मोरे, आंतरराष्ट्रीय आर्थिक सल्लागार, दिलीप देशमुख, जॅकपूट ऑफ इंडियाचे मिथिलेश देसाई, अन्नपूर्णा इंडस्ट्रीचे शामल पवार, अर्णव कॅफेचे जयवंत करंडे, राज डेकोरेटर्सचे विजय कुवळेकर, के. के. ग्रुप ऑफ कंपनीचे कल्पेश शीतप, वृषाली क्रिएशनचे दिलीप पातेरे, आदित्य रिअल इस्टेटचे जयेश गोमाणे, अजरामर कोकम सरबतचे जयंता ऊर्प भाऊ सरदेसाई, सुनील सेल्स ऍण्ड सर्व्हिसेसचे सुनील गेले, संजय ओकटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय देसाई, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, शिवसेना (उबाठा) संगमेश्वर तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष थेराडे, कडवईच्या सरपंच विशाखा कुवळेकर यांच्यासह शिवभक्त कोकण व निलक्रिएटरचे पदाधिकारी, प्रशांत यादव यांचे हितचिंतक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.