रत्नागिरी:-जिल्हा परिषदेमार्फत यावर्षीही जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ संशोधनाबाबत जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी नासा (अमेरिका) येथे सफर घडवण्यात येणार आहे. त्यासाठी या वेळेस जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेत एकूण 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हे सर्व विद्यार्थी येत्या जूनच्या पहिल्या आठवड्यात नासा भेटीसाठी रवाना होणार आहेत.
नासा व इस्त्रो या अभ्यास दौऱयासाठी जिल्हा परिषद शाळास्तरावर 251 केंद्रांवर 20 हजार 511 विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून एकूण 55 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. त्यातील 20 मुले नासासाठी निवडली गेली आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षीप्रमाणे यावर्षीही नासा व इस्त्रो भेटीसाठी जि.प. पशासनस्तरावर केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून नासा-इस्त्रो संस्थांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. नासा भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी येत्या 5 ते 17 जून असा दौरा करणार आहेत. त्यांच्यसोबत जिल्हा परिषदेतील अधिकारी, शिक्षक अशी 6 जणांची टीम राहणार आहे.
निवड झालेले विद्यार्थी तालुकानिहाय
मंडणगड-ओम शैलेश कोबनाक (केंद्र शाळा देव्हारे), आक्षा संदीप आग्रे (केंद्रशाळा चिंचघर), दापोली-मानिनी मंगेश आग्रे (जि.प. शाळा मळे), शुभम जयंत जोशी (जि.प. शाळा कोळथरे), खेड- सार्थक पकाश महाडिक (जि.प. शाळा धामणदेवी बेलवडी), किर्ती केशव मुंढे (जि.प. शाळा असगणी नं.2), चिपळूण- दक्ष दिनेश गिजये (जि.प. शाळा पाग मुलांची), इच्छा सीताराम कदम (जि.प. शाळा अनारी), गुहागर- विराज विष्णू नाचरे (जि.प. शाळा पाभरे), पूर्वा उमेश जाधव (जि.प. शाळा पिंपर नं.1), संगमेश्वर- पसाद सतीश धामसेकर (केंद्रशाळा डिंगणी, गुरववाडी), स्वराज दिलीप पाक्तेकर (जि.प. शाळा डिंगणी, खाडेवाडी), सिध्दी भिमराव पाटील (छ.शिवाजी आदर्श विद्यामंदिर देवरुख नं.4), रत्नागिरी- ऋषभ गौतम गायसमुद्रे (कुवारबाव महालक्ष्मीनगर शाळा क.2), श्रेया संदीप आग्रे (जि.प. शाळा कोळीसरे नं.1), लांजा-पणव लक्ष्मण कोलगे (पाथमिक शाळा जावडे क.1), सुमेध सचिन जाधव (आदर्श शाळा शिरवली), राजापूर-जस्लिन फैय्याज हाजू (जि.प. शाळा खरवते नं.1), शर्वरी सुघोष काळे (पाथमिक शाळा गुजराळी), शमिका संतोष शेवडे (पाथमिक शाळा कोतापूर नं.1).
जिल्ह्यातील 20 विद्यार्थी 5 ते 17 जूनदरम्यान जाणार नासा अभ्यास दौऱ्यावर
