चिपळूण:-वीजखांबावरुन पलिकडे झाडावर जात असलेल्या माकडाला विजेचा धक्का बसून त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. बराच काळ हे माकड वीजखांबावर चिकटून होते. अखेर महावितरणचे कर्मचारी दाखल झाल्यानंतर वीजपुरवठा बंद करुन त्या माकडाला वीजखांबावरुन खाली काढले.
शहरातील हॉटेल हायवेसमोर एका प्रकार घडला. हॉटेलच्या इमारतीवरुन आलेली माकड पुढे जात असताना रस्त्यालगत असलेल्या वीजखांबावर माकड आले असताना या खांबावर असलेल्या वीजच्या धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हे माकड बराच वेळ त्या खांबावर चिकटून आले. अखेर याची माहिती महावितरणला दिल्यानंतर कर्मचारी दाखल होताच वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर त्या माकडाला वीजखांबावरुन खाली काढले.
चिपळुणात विजेचा धक्का बसून माकड ठार
