रत्नागिरी पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेस यश
रत्नागिरी प्रतिनिधी:-रत्नागिरीतील एम आय डी सी येथे असलेल्या आर्जू कंपनीतील आणखी दोघांना फासवणुक प्रकरणी अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात “आरजू टेक्सोल कंपनी” विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाची व्याप्ती लक्षात घेऊन अधिक तपास रत्नागिरी पोलीस दलाची आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली. या गुन्ह्यामध्ये आता पर्यंत दोन इसमांना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेस यश मिळाले आहे. संजय गोविंद केळकर (४९ वर्षे, रा. घर नं. ३५०, अथर्व हॉटेल शेजारी, तारवेवाडी-हातखंबा ता. जि. रत्नागिरी) यास दि. २६ रोजी १८.३० वा. अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर दुसरा संशयित प्रसाद शशिकांत फडके (३४, वर्षे, रा. घर नं. ७२, ब्राम्हणवाडी, रामेश्वर मंदिराजवळ गावखडी, ता. जि. रत्नागिरी) याला २८ मे रोजी १२ वा. अटक करण्यात आली. या मधील अन्य आरोपीत नजरेआड आहेत.
रत्नागिरी पोलीस विभागाच्या (EOW) आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळ्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना अटक केले आहे.
सदर प्रकरणी आजवर बळी पडलेल्या 115 लोकांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत.
आपली तक्रार नोंदवू इच्छिणाऱ्या सर्व नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत EOW कार्यालयात भेट देण्याची विनंती करण्यात आली आहे.
▪️कृपया संबंधित कंपनीत गुंतवणुकीचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि फसवणूक करणाऱ्या कंपनीकडून तुम्हाला मिळालेला कोणताही पत्रव्यवहार यासह सर्व संबंधित कागदपत्रे सोबत आणवित.
▪️ जबाब नोदंविण्याकरिता ज्या नागरिकांनी संबंधित कंपनीत गुंतवणूक केली आहे आणि ज्यांच्या तक्रारी नोंदवण्याची इच्छा आहे अशा नागरिकांशी EOW जबाब नोंदविण्याकरीता भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी आपल्याला टप्या-टप्याने संपर्क करून बोलावण्यात येईल.
▪️सर्व नागरिकांनी शांतता व संयम राखावा तसेच कार्यालयात अनावश्यक गर्दी टाळावी.
रत्नागिरी पोलीस दल प्रत्येक तक्रारीची काळजीपूर्वक हाताळणी करण्यासाठी कटिबद्ध आहे.
▪️कोणत्याही तातडीच्या शंका किंवा समस्यांसाठी, कृपया डायल-112 वर अथवा आमच्या हेल्पलाइन नंबर +919421137380 वर संपर्क साधावा.