निवळी येथील अगोंडे यांचे समाजकार्य
तरवळ/ अमित जाधव:-रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथीलरहिवाशी श्री. उदय आणि सौ. हर्षदा अगोंडे यांचा सुपुत्र कुमार “उविंश” याचा पहिला वाढदिवस २४ मे रोजी माहेर संस्थेमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. माहेर संस्थेला वाढदिवसा प्रित्यर्थ धान्य देण्यात आले. तसेच संस्थेतील शिक्षण घेत असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. याशिवाय महिलांना उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.
अगोंडे दांपत्याने सामजिक भान राखत आपल्या मुलाचा पहिलाच वाढदिवस अशा निराधार लोकांबरोबर साजरा करून समजापुढे एक आदर्श ठेवला आहे.ग्रामीण भागातील लोकांमध्ये याप्रकारची भावना निर्माण होते आहे. हेच खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेल्या या कृतीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.बाळाला शुभाशिर्वाद देण्यासाठी रानपाट येथील श्री. मुरलीधर गोनबरे , मयुर गोनबरे उपस्थित होते.
तसेच माहेर संस्थेमधील कर्मचाऱ्यांसह बाळाचे आई – वडील, सहकारी गावकरी मंडळी, रानपाट येथील उविंशचे आजोबा, मामा, आजी सौ. मधुरा गोनबरे, श्री. व सौ. अर्पणा सचिन गोनबरे आणि बापू बोंबले आदी उपस्थीत होते.