खेड/सुदर्शन जाधव:- जल फाउंडेशन कोकण विभाग चे अध्यक्ष श्री.नितीन जाधव साहेब आणि थोर समाजसेवक सन्माननीय श्री.खालिद भाई यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र काॅलेज ऑफ आर्ट्स,सायन्स व काॅमर्स,मुंबई यांच्यामार्फत शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे या विद्यालयाला ५० लिटर प्रती तास क्षमतेचा वॉटर प्युरिफायर (रु. 47500/-) मिळाला आणि तो २४ मे २०२४ रोजी विद्यालयात लावण्यात आला.
यासाठी समाजसेवक खालीद भाई चौगुले साहेब, जलफाऊंडेशन चे अध्यक्ष सन्माननीय श्री.नितीन जाधव साहेब,चोरवणे गावचे सुपुत्र कविवर्य,पत्रकार, समाजसेवक व शाळेचे माजी विध्यार्थी व नेहमीच शाळेसाठी धडपड करत असणारे श्री.सुदर्शनजी जाधव,आपल्या संस्थेचे सदस्य सन्माननीय श्री वसंतजी मोरे साहेब,शाळेचे माजी विध्यार्थी व संस्थेचे अध्यक्ष श्री बी.एम.उतेकर यांचे बंधू सन्माननीय श्री.मंगेश उतेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.गावडे सर यांचे अथक प्रयत्न व सहकार्य लाभले. तसेच या कामासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे नागेश्वर सेवा शिक्षण प्रसारक मंडळ चोरवणे या संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.कारण सदर वाॅटर प्युरिफायरमुळे सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्थ होणार आहे.विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी उपलब्ध झाल्यामुळे चोरवणे ग्रामस्थ मंडळ तसेच विश्वस्त मंडळाने आभार मानले आहेत.