रत्नागिरी:-मुंबईतून गोव्याकडे भीक मागण्यासाठी निघालेली 5 अल्पवयीन मुले रेल्वे पोलिसांच्या चाणाक्ष नजरेत आली. त्या सर्वांना रत्नागिरी येथील चाईल्डलाईन व महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून संबंधितांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.
मुंबई येथून 5 अल्पवयीन मुले रेल्वेने गोव्याकडे जात होती. यामध्ये मानखुर्द येथील 3 तर सुरत आणि गुजरात येथील प्रत्येकी एका मुलाचा समावेश होता. रेल्वे प्रवासादरम्यान ती सर्व अल्पवयीन मुले रेल्वे पोलिसांच्या नजरेत आली. त्या सर्वांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी गोव्याकडे निघाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना रेल्वे पोलिसांनी रत्नागिरी येथील चाईल्डलाईनच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधितांकडे सुपूर्द करण्यात आले.
मुंबईतून गोव्याकडे जाणारी 5 अल्पवयीन मुले रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
