रत्नागिरी:-देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेने ३१ मे रोजी रत्नागिरी ते वैभवाडी रोड विभागादरम्यान अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे या विभागातून जाणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे.
सकाळी ९:१० ते ११:४० या वेळेत हा मेगाब्लॉक असणार आहे.
मान्सूनपूर्व कामाचा भाग म्हणून कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध मार्गांवर देखभाल, दुरुस्तीची कामे केली जात आहेत. त्यासाठी आवश्यकतेनुसार मेगाब्लॉक घेतला जात आहे. शुक्रवार, ३१ मे रोजी रत्नागिरी ते वैभवाडी रोड विभागादरम्यान अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस (१०१०६) या गाडीचा ३१ मे रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड – वैभववाडी रोड विभागादरम्यान ८० मिनिटांसाठी रोखून धरला जाणार आहे. तसेच, मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन (१२०५१) या जनशताब्दी एक्स्प्रेसचा ३१ मे रोजी सुरू होणारा प्रवास चिपळूण – रत्नागिरी स्थानकादरम्यान ४० मिनिटांसाठी स्थगित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन (२२११९) या तेजस एक्स्प्रेसचा ३१ मे रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी स्थानकावर २० मिनिटांसाठी थांबविला जाईल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक
