नाशिकच्या भाविकांवर काळाचा घाला
पालघर:-नाशिकहून जीवदानी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या जीपला अपघात झाला. या अपघातात 3 ठार, 7 जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली.
पालघरमधील जव्हार-विक्रमगड मार्गावरील वाळवंटा येथे भीषण अपघात झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील काही भाविक हे विरार एथे जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जात होते. या भाविकांच्या जीपचा आणि टेम्पोची धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघे जण ठार झाले आहे तर ७ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात गंगुबाई दशरथ कोरडे, निवृत्ती गणपत पागे, सुंदराबाई निवृत्ती पागे या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर आणखी सात जण गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालय तर काही जणांवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आंबेगण येथील काही भाविक हे विरार येथील जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जात होते. यावेळी त्यांच्या गाडीला टेम्पोने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. हे सर्व भावीक दर्शनासाठी जात होते.
त्यांची जीप ही पालघर येथे जव्हार विक्रमगड मार्गावरील वाळवंटा येथे डॉन बॉस्को स्कूल समोर आली असता एका भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने त्यांच्या जीपला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती कि, या धडकेत संपूर्ण जीपचा चक्काचूर झाला आहे. तर टेम्पोचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचे दृश्य भयावह होते. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलवत जखमी आणि मृत नागरिकांना जव्हार येथील रुग्णालयात दाखल केले.