संगमेश्वर:-देवरूख नजीकच्या साडवली येथील कै. मीनाताई ठाकरे विद्यालयाचा विद्यार्थी कु. पार्थ केतन ब्रीद याने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवल्याबद्दल संगमेश्वर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पार्थ ब्रीद याचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देवरूख येथील निवासस्थानी जावून पार्थचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पार्थ ब्रीद हा साडवलीतील कै. मीनाताई ठाकरे विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील केतन ब्रीद हे याच विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पार्थने नियमीत अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत विद्यालयाचे व तालुक्याचे नाव उंचावले आहे. त्याने हे सुयश संपादन केल्याबद्दल संगमेश्वर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष सचिन मोहिते यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून त्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव निलेश जाधव, सहसचिव मिथून लिंगायत, खजिनदार सुरेश करंडे, सल्लागार प्रमोद हर्डीकर उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी पार्थच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.
साडवलीच्या पार्थ ब्रीदने दहावीत मिळवले १०० टक्के गुण; संगमेश्वर तालुका पत्रकार संघटनेच्यावतीने सत्कार
