दापोली:-तालुक्यातील हर्णे-ब्राह्मणवाडी येथील 56 वर्षीय प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. रामनवल मोहित चव्हाण असे प्रौढाचे नाव आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तरपदेशमधील गाजीपुरा जिल्ह्यातील जखनिया तालुक्यातील मुरवदूमपूर पोस्ट भुडकुडा येथील रहिवासी असलेले चव्हाण सध्या हर्णे-ब्राह्मणवाडी येथे वास्तव्यास होते. त्यांना गेल्या 4 वर्षांपासून हृदयरोगाचा आजार असल्याने दापोलीमधील भाटकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी 5.45च्या सुमारास चव्हाण यांनी हर्णे येथील घरी योगा केला. त्यानंतर अचानक घाम आला व खुर्चीतून खाली कोसळले. त्यांना उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने मृत घोषित केले. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दापोली हर्णे येथे प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
