दापोली:-शहरातील महालक्ष्मी रोडवरील कब्रस्तानजवळ 2 दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी 1 च्या दरम्यान घडली.
याबाबती फिर्याद किराणामाल दुकान व्यावसायिक सर्वेश काशिनाथ जाधव (39, रा. टाळसुरे) यांनी दिली. फिर्यादीनुसार जाधव हे हिरो प्लेझर मोपेड दुचाकी घेऊन महालक्ष्मी रोडकडून दापोलीकडे चिकन घेण्यासाठी जात होते. ते महालक्ष्मी रोडवरील कब्रस्तान जवळ आले असता समोरून येणाऱ्या एका अज्ञात दुचाकीस्वराने (08 ए. एस. 5173) जाधव याच्या दुचाकीला धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. ग्रामीण वार्ताला मिळालेल्या माहितीनुसार,अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.
दापोलीत दोन दुचाकीच्या अपघातात दोघे जखमी
