रत्नागिरी:-नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्याचा विजयी जल्लोष साजरा करताना मारहाण झाल्याची घटना साखरतर येथे घडली. या मारहाणीत एका माजी चेअरमनला चोप दिल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी रात्री घडलेला हा पकार पोलिसांपर्यंत गेला मात्र सोमवारी उशिरापर्यंत त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
केकेआर व सनराईज हैद्राबाद यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना रंगला. या सामन्यामध्ये केकेआर संघ जिंकला. त्याचा साखरतर येथील तरुणांनी जल्लोष करण्यासाठी रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी केली. त्या आवाजामुळे लगतच्या एका घरात लग्नकार्य असल्यामुळे तेथील लोकांनी फटाके वाजविणे बंद करा, असे सांगितले. त्या बोलण्याचा राग अनावर झालेल्या तरुणांनी तेथील सोसायटीच्या माजी चेअरमनला बदडल्याचे समोर आले आहे.
आयपीएल सामना जिंकल्यावरून जल्लोष करताना हाणामारी, माजी चेअरमनला दिला चोप
