संगमेश्वर:-तालुक्यातील आंगवली रेवाळेवाडी येथे बिबट्याने गोठ्यात घुसून 3 पाड्याना ठार केल्याची घटना सोमवार 27 मे रोजी सकाळी उघडकीस आली. विश्राम रेवाळे यांच्या मालकीच्या गोठ्यात 6 जनावरे बांधली होती. यातील तीन पाड्यांवर बिबट्याने रविवारी मध्यरात्री हल्ला चढवून ठार केले. हा गोठा घरापासून 1 कि.मी. अंतरावर आहे. रेवाळे सोमवारी सकाळी गोठ्यामध्ये गेले असता 3 पाडे मृतावस्थेत आढळले. 3 पाड्यांचा मृत्यू पाहून पायाखालची वाळू सरकली. वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करण्यात आला.