देवरुख:-संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथील 50 वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. सुनिता यशवंत सुर्वे असे मृत महिलेचे नाव आहे. सुनिता सुर्वे या रविवारी घराच्या अंगणामध्ये लाकडे लावण्याचे काम करत होत्या. अचानक त्यांना सर्पदंश झाला. सुर्वे यांना तत्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रवासादरम्यान सुर्वे यांची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून सुनिता सुर्वे यांना मृत घोषित केले.