चिपळूण:- येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे समन्वयक, इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा रत्नाकर कुलकर्णी स्मरणार्थ ‘मसाप कार्यकर्ता पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा पुरस्कार देशपांडे यांच्या कन्या सौ. आसावरी देशपांडे जोशी यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते स्वीकारला. ‘मसाप’च्या पुण्यातील माधवराव पटवर्धन सभागृहामध्ये मसापच्या ११९व्या वर्धापनदिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मीनाताई प्रभू, फ्रान्सिस वाघमारे आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, उपाध्यक्ष दिलीपराज प्रकाशनचे राजीव बर्वे, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होत. कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.