जाकादेवी/ संतोष पवार:- रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाचा इ. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९९.३७ % लागला असून विद्यालयातील गुणवंत विद्यार्थीनी कु.वैष्णवी वासुदेव गोवळकर हिने ८९.६० % गुण मिळवून विद्यालयात सर्वप्रथम आली आहे.
विद्यालयात द्वितीय येण्याचा बहुमान कु.प्राजक्ता पंढरीनाथ जाजनुरे ८९.४०% हिने,तर कु. पायल अमोल गव्हाळे हिने ८९ टक्के मार्क मिळवून विद्यालयात तिसरी आली आहे. या प्रशालेतून एकूण १६० पैकी १५९ विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी असलेली ही शाळा आहे. यशस्वी व प्राविण्य प्राप्त विद्यार्थी ,मार्गदर्शक विषय शिक्षक, मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक यांचे मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे उपक्रमशील व धडाडीचे चेअरमन श्री.सुनिल उर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, कोषाध्यक्ष संदीप कदम, संस्थेचे सचिव व मालगुंड विद्यालयाचे सीईओ विनायक राऊत, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, संस्थेचे संचालक व जाकादेवी विद्यालयाचे सीईओ किशोर पाटील यांच्यासह ,संचालक मंडळ, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ ,पालक यांनी खास अभिनंदन केले आहे.