तरवळ/ अमित जाधव:-रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालयाचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल १००टक्के लागला आहे.
सदर परीक्षेसाठी विद्यालयातून ११३विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी सर्वच उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये कुमारी आर्या अमोल सुर्वे ही ९६.८०टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात पहिली आली आहे तर कुमारी श्रिया अभिजीत केळकर हिला ९५.८०टक्के गुण प्राप्त झाले आहेत व विद्यालयात द्वितीय आली आहे तसेच कुमारी अपूर्वा किरण सावंत हिला ९१.६०टक्के गुण प्राप्त झाले आहेत व ती विद्यालयात तृतीय आली आहे.
प्रशालेच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल मुख्याध्यापक श्री बिपिन परकर व पर्यवेक्षक श्री उमेश केळकर यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच मालगुंड एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष श्री सुनिल ऊर्फ बंधू मयेकर, उपाध्यक्ष श्री विवेक परकर सचिव विनायक राऊत, खजिनदार संदीप कदम तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.