कडवई : कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला.
विद्यालयातून ७५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते पैकी १५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले.३२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.प्रशालेतील मनश्री मिलिंद कडवईकर हिने ९३.४०% घेत प्रथम क्रमांक पटकावला.मधुरा राम रेडीज हिने ९२.८० % प्राप्त करत द्वितीय तर दीप्ती शेषेराव अवघडे हिने ८८.२० % गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.या विद्यार्थ्यांना सिद्धी सुर्वे, सूरज कदम,निलेश कुंभार,मिलिंद कडवईकर,आशिष सरमोकादम,शशिकांत किंजळकर, समीर भालेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत यलगुडकर,सचिव वसंत उजगावकर,मुख्याध्यापक शेषेराव अवघडे,पर्यवेक्षक संतोष साळुंके,शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.