रत्नागिरी:रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भाट्ये बीज येथे स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
हा मेळावा आश्रय जेष्ठ नागरिक संघटनामार्फत सुहेल मुकादम, शकील गव्हाणकर, पराग भाटकर ,सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
दररोजच्या जीवनशैलीतून एक दिवस मनमुराद गप्पा, मनोरंजन, कर्मणूक व आरोग्य आणि इतर माहिती तसेच एकमेकांच्या विचारांची आदान प्रदान असे कार्यक्रम तसेच या स्नेह मेलाव्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सदर मेलाव्यास बहारदार जुनी गाणी ऑर्केस्ट्रा फिल्म अल्ताफ मिरकर व त्यांची टीम यांनी सादर केली.
हा मेळावा सकाळी 9:30 पासून सुरु झाला. यामध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक स्त्री, पुरुष यांनी सहभाग घेतला होता.
या मेलाव्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न
