रत्नागिरी :- इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी रजि. चि. बेळगावी व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी या संस्थातर्फे डी. जे. सामंत प्रशालेच्या गुणवंत मुख्याध्यापिका सौ. नूतन नितीन कांबळे यांना राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक गौरव पुरस्काराने बेळगावीचे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, कर्नाटक राज्याचे होमगार्ड विभागाचे अरविंद घट्टी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सन्मानित केले. या पुरस्काराबद्दल सौ. नुतन कांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पाली येथील डी.जे.सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. नुतन नितीन कांबळे यांना यापूर्वी मातृसेवा फाऊंडेशन ठाणे आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र राज्य या संस्थातर्फे
सन २०२३ – २४ या वर्षातील राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक सन २०२३-२४ हा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.
तर आता बेळगावी येथील संस्थातर्फे राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक, विद्यमान उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी, रायगड जिल्हा आदरणीय ना. उदय सामंत, संस्था अध्यक्ष आर. डी.सामंत तथा अण्णा सामंत, संचालिका सौ. स्वरूपा सामंत तथा सामंत, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीवर्ग आणि पालकवर्ग या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.
डी.जे.सामंत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नुतन कांबळे राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक गौरव पुरस्काराने सन्मानित
