दापोली:- तालुक्यातील जामगे मोहल्ला येथे क्षुल्लक कारणावरून बाप-लेकाला मारहाण केल्याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली. यामध्ये बाप-लेख जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद मुजफ्फर असलम नागुठणे (34, जामगे मोहल्ला दापोली) यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास नागुठणे आपल्या घरी परत येत असताना त्या घरी जाण्याचा रस्ता गावातील 12 जणांनी अडवून धरला. त्या वेळेला बरकत तांबे याने ‘तू माझ्या बहिणीला शिव्या देतोस’ असे बोलून काठीने तसेच लाथ्या बुक्क्याने मारहाण केली. तसेच नागोठणे याचे वडील असलम अहमद नागुठणे यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये मुजफ्फर असलम नागुठणे, असलम अहमद नागुठणे (57) दोघे जखमी झाले.
याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात भादवि कलम 143, 147, 148, 149, 324, 341 नुसार बानू मुराद हवा, बरकत हुसेन तांबे, रमिज सिकंदर हवा, अहमद अकबर नागुठणे, अकबर अहमद नागुठणे, सादिका अकबर नागुठणे, अर्शिया अकबर नागुठणे, मुराद अब्दुल रहमान हवा, मुसद्दीक कासिम हवा, तोहीद गणि नागुठणे, जमीर कादिर पेटकर, अरफाद शौकत हवा (जामगे मोहल्ला) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.