रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील पाली उभी धोंड येथे गॅसवाहू टँकर महामार्गाच्या लगत खोल भागात कोसळून अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडला.
कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने टँकर महामार्गाच्या लगत खोल भागात कोसळला. अपघातावेळी चालकाने टँकर बाहेर उडी मारल्याने सुदैवाने बचावला. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची अद्याप पाली पोलीस दूरक्षेत्रात नोंद करण्यात आली नाही आहे.
पाली उभी धोंड येथे गॅस टँकर पलटी होऊन अपघात
