मुंबई:-रेवस रेडी सागरी मार्ग कुणकेश्वर तीर्थक्षेत्राच्या अगदी समोरून समुद्राच्या दिशेने जाणार आहे. सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी या जागी नव्याने पूल उभारला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पूलांच्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत. याकामासाठी तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या आहेत. दोन कंपन्यांनी या पुलाच्या कामासाठी स्वारस्य दाखविले आहे.
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रेवस रेडी सागरी महामार्गावरील काळबादेवी खाडी येथे मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी तांत्रिक निविदा उघडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रेवस ते कारंजा खाडीपुलासाठी अशोका बिल्डकॉन आणि विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या तर आगरदांडा ते दीघी खाडीपुलासाठी अशोका बिल्डकाॅन, टी अँड टी इन्फ्रा तसेच विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या कंपन्यांमध्ये चुरस आहे. या पुलाचा कच्चा आराखडा बनविण्यात आला आहे. हा सागरी पूल १.६ किलोमीटर एवढ्या लांबीचे असणार आहे. या सागरी महामार्गामुळे कुणकेश्वर मंदिराच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यटनाला चालना मिळणार आहे. या पुलाशिवाय या सागरी महामार्गावर खालील ५ पुलांसाठी नवीन मागविण्यात आल्या आहेत. या सर्व पुलांसाठी ३ हजार १०५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे.
रेवस रेडी हा सागरी महामार्ग कोकणातील किनाऱ्यालगतच्या अरुंद गावठाणातून जाणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून हा सागरी मार्ग जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस सागरी मार्गाची सुरवात होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेड्डी येथे शेवट होणार आहे.
• कुंडलिका खाडीवरील रेवदंडा-सालाव – 3.8 किमी
• बाणकोट खाडीवर कोलमांडिया-वेश्वी – 1.7 किमी
• दापोली-गुहागर दाभोळ खाडीवर – 2.9 किमी
• जयगड खाडीवर तवसाळ-जयगड – 4.4 किमी
• काळबादेवी खाडीवरील पूल, रत्नागिरी – 1.8 किमी
मुंबई सिंधुदुर्ग प्रवास सुसाट होणार
