रत्नागिरी:-जिल्ह्यातील नव्या शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या शिक्षकांना शाळा नियुक्त्या देण्यासाठी आयोजित समूपदेशन प्रकियेसाठी एकूण 1 हजार 38 शिक्षक उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. सोमवार, मंगळवार अशा दोन दिवस पार पडलेल्या या समूपदेशनासाठी 26 शिक्षक उमेदवार गैरहजर राहिले होते. तर 996 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. हे सर्व शिक्षक नव्या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील पाथमिक शाळांवर हजर होणार आहेत.
शिक्षक भरतीमधून रत्नागिरी जिल्हा परिषदेला एकूण 2068 शिक्षक सेवकांची यादी शिफारशीसह प्राप्त झाली. यामध्ये 1010 मराठी माध्यम व 58 उर्दू माध्यम शिक्षकांची यादी प्राप्त झाली. या शिक्षकांची यादी प्राप्त होताच सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून घेण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर एकूण 1038 उमेदवारांना समूपदेशनाने नियुक्ती देण्यासाठी मार्च 2024 मध्ये समूपदेशनाची तारीख ठरवण्यात आली होती. परंतु या कालावधीमध्ये लोकसभा सावत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यामुळे समुपदेशनाची प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली, शिक्षणाधिकारी (प्राथ.) बी. एम. कसार व त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांच्या उपस्थितीत 20 व 21 मे 2024 रोजी रा. भा. शिके, माध्यमिक विद्यालय रत्नागिरी येथे उमेदवारांना नियुक्तीकरिता शाळा देण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. समुपदेशनातून नवनियुक्त शिक्षकांना नियुक्ती देण्यासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, यांचेकडून रिक्त पदांची यादी घेऊन ही रिक्तपदे मोठ्या स्किनवर उमेदवारांना दाखवण्यात आली. शासन निर्णयानुसार समूपदेशनासाठी प्रथम दिव्यांग उमेदवार, नंतर महिला व शेवटी पुरुष उमेदवारांना त्यांच्या गुणवत्ता क्रमानुसार सर्व उमेदवारांच्या समोर क्रीन पाहून शाळा निवडीची संधी देण्यात आली. यामुळे उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार शाळा निवडण्याची संधी मिळाली. त्यामुळे उमेदवारांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
समुपदेशन प्रक्रियेतून 996 शिक्षकांना नियुक्तीपत्र
