चिपळूण:- तालुक्यातील सावर्डे सहित डेरवण या गावामध्ये काल झालेल्या तुफानी वादळी झालेल्या मुसळधार पाऊसामुळे ग्रामस्थांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
या वादळी पाऊसामुळे सावर्डे-डेरवण येथील दत्तमंदिर, धावडेवाडी, काजरकोन्ड, डेरावण रोड, गणेशवाडी येथील रस्त्यावरील व इतर ठिकाणी असलेली झाडे उनमळून पडली तसेच घरांवरील छपरे उडाली आणि त्यामुळे झाडांच्या निवांऱ्याखाली लावलेल्या दोनचाकी, चारचाकी गाड्यांवर झाडे पडल्यामुळे गाड्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे.
ही बातमी कळताच आमदार शेखर निकम यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्यासमवेत सर्व नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. ग्रामस्थांकडून सर्व माहिती घेत सर्वाना धीर दिला याबाबत अधिकारी वर्गाला पंचनामे करण्यास सांगून तातडीने कार्यवाही करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देणेबाबत आदेश दिले आणि महावितरण अधिकाऱ्यांस विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास सांगितले व तहसीलदार, प्रांताधिकारी यांनासुद्धा दूरध्वनी संपर्क साधत याबाबत माहिती देत त्याच्याशी नुकसान भरापाईबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी बाळुशेठ मोहिरे, जमीर मुल्लाजी, प्रकाश कानसे, सचिन बागवे, बाबू कातकर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
सावर्डे येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार शेखर निकम यांनी केली प्रत्यक्ष पहाणी
