चिपळूण: रत्नागिरी रग्बी असोसिएशन व रग्बी असोसिएशन ऑफ़ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रग्बी प्रशिक्षण शिबिर श्री विठ्ठलराव जोशी चारिटेबल ट्रस्ट क्रीडा संकुल, डेरवण येथे डॅा. योगिता खाडे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केले होते. शिबिराच्या उद्घाटनासाठी डेरवण क्रीडा संकुलचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश माटे, सचिव डॉ. योगिता खाडे, रग्बी असोसिएशनचे सदस्य समीर काझी यांच्या उपस्थितीत पार पडले.
या शिबिरासाठी महाराष्ट्र रग्बी असोसिएशनचे प्रशिक्षक ईश्वर राजकोठारी, मनोज इंगोले, बबलू यादव, यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तसेच चिपळूण तालुका प्रशिक्षक शशिकांत उदेग, अक्षय चव्हाण, गुहागर तालुका प्रशिक्षक हुजैफा ठाकुर, प्रणीत सावंत, खेड तालुका प्रशिक्षक मंदार साळवी, रत्नागिरी तालुका प्रशिक्षक स्वप्नाली पवार, स्वानंद खेडेकर, लांजा तालुका प्रशिक्षक हर्ष माने, सोबिया हाजू, राजापूर प्रशिक्षक युवराज मोरे, हितेंद्र सकपाळ, संगमेश्वर प्रशिक्षक संयोग बेटकर, गौरी देवरुखकर, कमलेश पाटील, संपदा निंबारे, सेजल जाधव, अंजली दांडेकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले.
डेरवण क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय रग्बी प्रशिक्षण शिबीर उत्साहात
