आंतरराष्ट्रीय सींगिंग व डान्स स्पोर्ट्स स्पर्धा
चिपळूण: महाराष्ट्र राज्य डान्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून रत्नागिरी व नागपूर येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेमधून अव्वल कामगिरी दाखवून या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड करण्यात आली होती. तर ४थी माउंट एवरेस्ट आंतरराष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स ही स्पर्धा दिनांक १९ मे रोजी नेपाळ काठमांडू नाच घर सांस्कृतीक भवन येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये चिपळूण येथील आठ वर्षाखालील गटामध्ये सिंगींग या प्रकारात प्रगती विकास पवार सुवर्ण पदक तर १० वर्ष खालील फोक डान्स प्रकारात नागपूर येथील मधुरा मेहेर सुवर्ण पदक, तर १४ वर्ष खालील डूयेट फोक डान्स प्रकारात निहिरा निखिल माळी व अनय सुनील सुतार सुवर्णपदक तर ३५ वर्ष खालील सुपर मॉमस फोक डान्स मध्ये सौ. ओजस्विणी ओंकार सावांतदेसाई सुवर्णपदक तर १४ वर्ष खालील ग्रुप हिप हॉप डान्स या प्रकारात काव्या दिपक चव्हाण, कू. आराध्या दिपक चव्हाण, भक्ती ऋषांत जाधव, पूर्वा ऋषांत जाधव सुवर्ण पदक घेत ठरले आंतरराष्ट्रीय ट्रॉफीचे मानकरी सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व करत भारताच्या इतिहासात आणखी एक भर टाकत आपली अवल कामगिरी दाखवून दिली.
विविध देशातून आलेल्या १६८ स्पर्धकांमध्ये ही लढत झाली असताना महाराष्ट्र राज्याचे या विद्यार्थ्यांनी आपल्या भारताचे नाव उंच स्तरावर नेऊन ठेवलेले आहे. या स्पर्धेकरिता राष्ट्रीय डान्स स्पोर्ट्सचे अध्यक्ष रजनीकांत ठाकूर तसेच महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व भारतीय संघाचे मॅनेजर तसेच चिपळूण येथील सुप्रसिद्ध डायडाज इंटरनॅशनल डान्स स्कूलचे संचालक सुरज जाधव यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले. तसेच या विजेते खेळाडूंना राष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स सेक्रेटरी रजनीकांत ठाकूर व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुरज विलास जाधव यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एशियन चॅम्पियनशिप या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.