चिपळूण: रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सचा निकाल १०० टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून कु. निहाल मोहिद्दीन दिवेकर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला तर कु. मोहम्मद हुसेन अली खान याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला व विज्ञान शाखेतून कु. आयेशा मुझफ्फर चौगुले हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. गेली अनेक वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा याहीवर्षी रिगलने कायम जपली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के, संचालक मंडळ प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना प्राचार्य श्रद्धा पवार, प्रा.वैशाली भोसले, प्रा. पूनम गुरव, प्रा. पूर्वा कापडी, प्रा. प्रियांका नाईक, प्रा. आयेशा मणियार यांचे मागर्दर्शन लाभले. नवीन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीची प्रवेश प्रक्रिया असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. प्रवेशासाठी अधिक माहितीसाठी किंवा प्रवेशासाठी रिगल कॉलेज कोंढे गुहागर रोड, ता. चिपळूण येथे किंवा ७७६८९८८५८४, ८३२९१०४८७६, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.regalcollege.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
रिगल ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायंन्सचा निकाल १०० टक्के
