चिपळूण: महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र शासनाचा उपक्रम विभागीय कार्यालय रत्नागिरी व चिपळुण तालुका सह. खरेदी विक्री संघ ता. चिपळुण यांच्या वतीने पशुखाद्याचे मार्गदर्शन शिबीर कामथे (ता चिपळुण) येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित दुध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक अजय काळे, चिपळुण संघाचे अध्यक्ष दिलीप माटे, व्यवस्थापक पाडुरंग कामळे यांच्या उपस्थीतीत सर्व दुध उत्पादक शेतकऱ्यांना महामंडळामार्फत सुग्रास पशुखाद्य गोल्ड, एचपी पॅलेट, स्पेशल एचपी पॅलेट, उत्त्म पॅलेट, सर्वोत्तम पॅलेट, महाशक्ती पॅलेट या पशुखाद्यांचा जनावरांच्या आहारात वापर करुन कशा प्रकारे दुधाचे उत्पादन वाढवता येईल या बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.