संगमेश्वर:-लहान वयातच स्वप्न पहिली तर लवकर यश मिळेल,असे प्रतिपादन प्रा.मिलिंद कडवईकर यांनी साखरी बुद्रुक-खुर्द येथे पार पडलेल्या करियर मार्गदर्शन शिबिरात केले.
कुणबी एकता सामाजिक संघटना,साखरी बुद्रुक- खुर्द,ता.गुहागर यांच्यावतीने पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रमुख वक्ते प्रा.मिलिंद कडवईकर यांनी करिअर निवडीचे टप्पे,करिअर निवडीवर परिणाम करणारे घटक,विविध अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या सीईटी परीक्षा,विविध करिअर पर्याय व यशस्वी होण्याचे मार्ग सविस्तरपणे समजावून सांगितले.
या कार्यक्रमाला कुणबी एकता मंडळाचे अध्यक्ष अनंत सुवरे,सुभाष शितप,खजिनदार चंद्रकांत म्हसकर,सरपंच प्राची पवार,भरत भुवड,महेंद्र भुवड,सुधीर टानकर, समीर पेडणेकर, हर्षद जावळे आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील सुमारे दोनशे ग्रामस्थांनी घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सुनील वरेकर यांनी केले.प्रास्ताविक अल्पेश शितप यांनी केले तर आभारप्रदर्शन शैलेश नाचरे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या मुंबई व गावच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
मोठी स्वप्न बघा यश नक्की मिळेल- मिलिंद कडवईकर
