अलिबाग:- येथील वृध्द महिलेला जेष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे सांगून ४० लाखांना लुटल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप बागल या प्रकरणाचा तपास करत आहेत.अलिबाग गोंधळपाडा येथे राहणाऱ्या एका वृध्द महिलेला रात्री साडे नऊच्या सुमारास व्हॉट्स ॲपवर कॉल आला.
सुरवातील टेलिकॉम रेग्युलेटरी अँथोरीटी ऑफ इंडीयातून बोलत असल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितले.
तुमच्या आधारकार्डाचा गैरवापर झाला असल्याचे सांगून तुमचा फोन बंद पडणार असल्याचे सांगितले. मात्र महिलेनी त्यास दाद दिली नाही. नंतर पुन्हा त्याच नंबरवरून या महिलेला पुन्हा फोन आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील आणि दिक्षित गेडाम बोलत असल्याचे सांगून महिलेचा सांगून तुमच्यावर मुंबई पोलिसांकडे विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असून, अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे सांगण्यास सुरुवात केली. ईडी आणि रिझर्व्ह बँकेकडून आपली चौकशी सुरू असून खरी माहिती देण्यास सांगतली. त्यामुळे सदर महिला घाबरली, हे लक्षात येताच समोरच्या व्यक्तीने तीच्याकडून बँक खात्याचा सर्व तपशील काढून घेतला आणि परस्पर ४० लाख ७१९ हजार रुपये काढून घेतले. चोरट्यांनी आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात येतांच सदर महिलेनी अलिबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारी नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणूक केल्या प्रकरणी भादवी कलम ४२०, ३४ आणि आयटी अँक्ट कलम ६६ डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
अलिबाग येथे विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने महिलेला 40 लाखांना लुटले
