चिपळूण: येथील डीबीजे महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९४.१३ टक्के लागला आहे. महाविद्यालयातून एकूण ९०४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी ८५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ८७ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत १९३, द्वितीय श्रेणीत ४१८ तर तृतीय श्रेणीत १५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागीय मंडळाचा एकूण निकाल ९७.५१ टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेतून ३५७ विद्यार्थ्यांपैकी ३५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये २२ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ८६ विद्यार्थी प्रथम श्रेणी, २०४ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ४२ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९९.१५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून ३९६ विद्यार्थ्यांपैकी ३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ५४ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ८५ विद्यार्थी प्रथम श्रेणी, १४५ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ७९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ९९.६६ टक्के लागला आहे. कला शाखेतून १५१ विद्यार्थ्यांपैकी १३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ११ विद्यार्थी विशेष प्राविण्य, २२ विद्यार्थी प्रथम श्रेणी, ६९ विद्यार्थी द्वितीय श्रेणी तर ३२ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ८८.७४ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून सृष्टी पोसनाक (९४.१७) प्रथम, गार्गी पडते (९१.५०) द्वितीय, शाजिना सय्यद (९०.५०), आदित्य कांबळी (८८.६७) चतुर्थ, जॉर्ज ग्रेस (८५.१७) हा पाचवा आला आहे. वाणिज्य शाखेतून सानिया शेख (९४.५०) प्रथम, सादिया केळकर (९४) द्वितीय, महरूफ कुंडलिक (९२) तृतीय, प्रणव गोडबोले व राजस वैद्य (९१.८३) यांनी चतुर्थ तर अफ्फान परकार (९१) पाचवा आला आहे. कला शाखेतून आयुष आगवेकर (९३.५०) प्रथम, प्राची तांबे (९०.३३) द्वितीय, सलोनी घडशी (८८.६७) तृतीय, पूर्वा खेडेकर (८६.१७) चतुर्थ, पुजा गुर्जर (८४.१७) पाचवी आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे नवकोकण सोसायटीचे अध्यक्ष बापू भिडे, चेअरमन मंगेश तांबे, व्हाईस चेअरमन डॉ. दीपक विखारे, डीबीजेचे प्राचार्य डॉ. माधव बापट, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य नामदेव तळप, पर्यवेक्षिका श्रीमती स्नेहल कुलकर्णी, प्रबंधक अनिल कलकुटकी व सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.