बँकेला लावला 18 लाख 21 हजार रुपयांचा चुना
रत्नागिरी:- बनावट दागिन्यांना सोन्याचा मुलामा देवून सोनेतारण कर्ज घेवून फसवणूक केल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार पूर्णगड येथे समोर आला आहे. संशयित आरोपी यांनी बँक ऑफ इंडिया पूर्णगड शाखेला तब्बल 18 लाख 21 हजार रूपयांचा चुला लावला आहे. पूर्णगड पोलिसांनी याप्रकरणी संशयित तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
अमेय सुधीर पाथरे (34, रा.पावस खांबडवाडी), अमाले गणपती पोतदार (47, रा. कोल्हापूर) व पभात गजानन नार्वेकर (32, रा.कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. नुकतेच सोने तारण कर्जप्रकरणात फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले होते. राजापूर येथील घरफोडीचा तपास करताना संशयित आरोपी यांचे कृत्य समोर आले. त्यानुसार त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हे सर्व प्रकार समोर आले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.