झर्ये नवतरुण विकास मित्र मंडळतर्फे उल्काताईंचे आभार
राजापूर:-तालुक्यातील झर्ये फळसवाडी येथील कित्येक वर्ष रखडलेल्या कॉजवे साठी सौ. उल्काताई विश्वासरावयांच्या माध्यमातून तब्बल ५५ लाखांचा निधी मंजूर झाला व त्या कॉजवेचे काम आज पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी व झर्ये नवतरुण विकास मित्र मंडळ यांनी त्यांचे आभार मानले.
नवतरुण विकास मित्र मंडळ, झर्ये (फळसवाडी) यांच्यातर्फे राजापूर लांजा साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख सौ. उल्काताई विश्वासराव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. उल्काताईंनी कॉजवेच्या कामाची संपूर्ण पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत झर्ये ग्रामपंचायत सरपंच सौ. स्मितलताई जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्री. अविनाशजी कदम, नवतरुण विकास मित्र मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ यांच्यात भारतीय जनता पार्टीचे सुपर वाॅरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.