मुंबई:-सर्वांच्या आवडता कार्यक्रम म्हणजे बिग बॉस. आता बिग बॉस मध्ये नवीन व्यक्ती होस्टिंग करताना दिसणार आहे. महेश मांजरेकर आता होस्टिंग करताना दिसणार नाहीत. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र महाराष्ट्राचा मराठमोळा अभिनेता या कार्यक्रमाचे होस्टिंग करताना दिसणार आहे.
बिग बॉस मराठी 5′ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. चौथा सीझन संपल्यापासून चाहते पाचव्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. आता ‘बिग बॉस मराठी 5’ संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘बिग बॉस मराठी’ सुरू झाल्यापासून महेश मांजरेकर या कार्यक्रमाचं होस्टिंग करत आहेत. पण आता पाचव्या पर्वाचा मात्र ते भाग नसतील. बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता रितेश देशमुख हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्र गेली दोन वर्षे ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होता, तो क्षण आता जवळ आला असून कलर्स मराठी आणि JioCinema वर ‘बिग बॉस मराठी’ चा नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेळी बिग बॉस मराठीचे होस्टिंग बॅालीवूडचा स्टार, प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेअर केला आला असून त्यामध्ये ‘बिग बॉस’चा डोळा त्याच सोबत बॅालीवूडचा स्टयलिश हिरो आणि महाराष्ट्राचा मराठमोळा मुलगा सुपरस्टार रितेश देशमुख देखील दिसत आहे. या नव्या सिझनचे हे नवे सरप्राईज असणार असून या सिझनमध्ये एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.