चार लाखांचे नुकसान
रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाटये येथे असलेल्या हॉटेल कोहिनूर हॉटेल मॅनेजमेंटच्या जुन्या इमारतीमध्ये अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आल़ी. यामध्ये सुमारे 4 लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आह़े. ही तोडफोड नेमकी कुणी व कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाह़ी. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केला आह़े.
रत्नागिरी पावस मार्गावरील भाटये बीच ओलांडल्यानंतर हॉटेल कोहिनूर असून याठिकाणी कोहिनूर हॉटेल मॅनेजमेंटची देखील इमारत उभारण्यात आली होत़ी. सध्या ही इमारत जुनी झाली असून वापराविना पडून होत़ी. 5 ते 11 मे 2024 या दरम्यानच्या काळात याठिकाणी अज्ञातांनी घुसून सर्व साहित्याची तोडफोड केल़ी. यामध्ये इमारतीमधील बेसीन, दरवाजे, इमारतीच्या काचा, इलेक्ट्रिक फिटींगचे सामान, बाथरूमधील नळ, शॉवर हेड, बेसीन सी पाईप आदींची तोडफोड व त्यातील काही माल चोरून नेत सुमारे 4 लाख रूपयांचे नुकसान केले असल्याचे तक्रारीत नमूद केले आह़े.
कोहिनूर हॉटेलचे व्यवस्थापक विजयेंद्र ओमप्रकाश सिंग (43, ऱा पावस रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरूद्ध भादंवि कलम 379, 427 नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.