रत्नागिरी:-कडक उन्हाळ्याबरोबरच भीषण पाणीटंचाईने जिल्ह्यात डोके वर काढले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 61 गावातील 158 वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू आहे. 43,960 ग्रामस्थांना 11 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.
मंडणगड तालुक्यातील एका गावातील एका वाडीतील 158 ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
दापोली तालुक्यातील 8 गावातील 12 वाड्यांमधील 4,082 ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. खेड तालुक्यातील 8 गावातील 26 वाड्यांमधील 3,774 ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. चिपळूण तालुक्यातील 16 गावातील 35 वाड्यांमधील 11,391 ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. संगमेश्वर तालुक्यातील 15 गावातील 22 वाड्यांमधील 2,507 ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.
रत्नागिरी तालुक्यातील 10 गावातील 27 वाड्यांमधील 21,423 ग्रामस्थांना 5 टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. लांजा तालुक्यातील 3 गावातील 5 वाड्यांमधील 625 ग्रामस्थांना एका टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. जिल्ह्यात एकूण 61 गावातील 158 वाड्यांमधील 43,960 ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरु आहे. 4 शासकीय आणि 7 खासगी अशा एकूण 11 टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात १५८ गावांत पाणी टंचाई
