( चिपळूण)
अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. चिपळूण गुहागर मार्गावर टेम्पोचा टायर फुटून अपघातात दोन महिला कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, घरावरील स्लॅब टाकण्यासाठी मशिनरी आणि कामगार घेऊन टेम्पो चालक सकाळी जात असताना टायर फुटून अपघात झाला. या अपघातात दोन महिलांचा चिरडून मृत्यू झाला. तसेच टेम्पोमध्ये आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान गाडीमध्ये नेमके किती जण होते? कुठुन आले होते? या विषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गाडीत मशिनरी आणि सामान अंगावर पडल्याने महिलांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे.
दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बाहेर काढण्यात आलेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.