राजापूर / प्रतिनिधी:-मोबाइल कसिनो खेळातुन मोठे नुकसान झाल्याने आलेल्या नैराश्यातुन राजापूर शहरातील एका ३७ वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करुन आपले जीवन संपवल्याची घटना मंगळवारी रात्री घडली . यातील मयत युवकाचे नाव विक्रांत विठ्ठल देसाइ असे असुन तो शहरातील एक व्यावसायिक होता.
याबाबत सुरु असलेल्या चर्चेनुसार मयत विक्रांत उर्फ राजा देसाइ या मोबाइलवर कसिनो खेळण्याचा नाद होता . त्यातुन त्याला मोठ्याप्रमाणात आर्थिक फटका बसला . मंगळवारी सायंकाळी तो अनेकाना राजापूर शहरात फिरताना दिसुन आला होता . त्यानंतर तो दिसुन आला नाही . परिणामी त्याच्या मित्रपरिवारासह घरच्यानी शोधाशोध करत त्याच्या मोबाइलवर सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फोन उचलत नसल्याने सगळीकडे शोधाशोध सुरु होती .
अखेर त्याच्या मोबाइल लोकेशन वरुन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो रानतळे येथील एका हापुस आंब्याच्या बागेत तो मृतावस्थेत आढळुन आला . याबाबतची माहिती राजापूर पोलिसाना देण्यात आली . पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले व मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला . बुधवारी सायंकाळी ४ वाजता त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले .
ज्या ठिकाणी विक्रांत याने आत्महत्या केली होती त्या ठिकाणी सुसाइड नोट आढळुन आल्याची चर्चा सर्वत्र सुरु होती . मात्र याबाबत राजापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता राजापूर पोलिसानी याबबतची माहिती देण्यास नकार दिला.