खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे औद्योगिक वसाहतीनजीक रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडक देत स्वत:सह चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वॅगनार चालकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अनंत बिर्जे (43 रा. परेल-भोईवाडा) असे गुन्हा दाखल झालेल्या वॅगनार चालकाचे नाव आहे.
तो आपल्या ताब्यातील कार (एम.एच. 01 व्ही.ए. 8779) घेवून परेलवरून राजापूरच्या दिशेने जात असताना लोटे येथील विनती कंपनीसमोर उभ्या असलेल्या कंटेनरला (एम.एच. 46 बी.बी. 4735) पाठीमागून धडक दिली. या अपघातात चारजण जखमी झाले होते. बेदकारपणे वाहन चालवून दुखापतीस कारणीभूत ठरल्या ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.