रत्नागिरी:-मुंबई येथे घडलेल्या होर्डींग दुर्घटनेची आता रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दखल घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व होर्डींग धारकांना सर्व होर्डींगचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्टक्चरल ऑडिट)करण्याच्या सुचना नगरपालीका प्रशासनाकडुन देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व शहरांमधील अनधीकृत होल्डिंग्जवर कारवाई करण्याची तयारी या विभागाकडुन करण्यात आली आहे.
नुकतेच मुंबईतल्या घाटकोपर येथे झालेल्या अनधिकृत होर्डींग कोसळल्याच्या दुर्घटनेत अनेकांनी आपले प्राण गमावले तर काहीजण गंभीर जखमी झाले. आता या परिसरातील सर्वच अनधिकृत आणि भव्य होर्डींग हटवण्याचा धडाका सुरु झाला आहे. आता या दुर्घटनेची गंभिर दखल रत्नागिरी जिल्ह्यात घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील नगरपालीका प्रशासनाकडुन आता जिल्ह्यातील सर्व नगरपालीका परिसरातील मोठमोठ्या होर्डींगचे संरचनात्मक लेखापरिक्षण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच परिसरातील अनधिकृत होर्डींगवर कारवाई करण्यासाठी अशा होर्डींगचा शोध सुरु झाला आला आहे.
सध्या रत्नागिरी शहरातच 17 व्यावसायीकांचे 192 होर्डिंगची नेंद नगरपालीकेमध्ये आहे. या होर्डींगची उंची जास्तीत जास्त 12 ते 20 फुट इतकीच आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या आधी या होर्डींगचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात येत असल्याचे नगरपालीकेकडुन सांगण्यात येत आहे. मात्र नगरपालीकेव्यतीरीक्त महामार्गांवर तसेच राज्य मार्गावर उभारण्यात आलेल्या मोठ्या हॉर्डींगची जबाबदारी मात्र संबंधित ग्रामपंचायतींकडे आहे. खाजगी जमिनीत अथवा सार्वजीनक ठिकाणी असे होर्डींग उभे करण्यासाठी ग्रामपंचायतींची परवानगी आवश्यक आहे. मात्र या ग्रामपंचायती आपल्या परिसरातील सर्व होर्डींगचे संरचनात्मक लेखापरीक्षण करुन घेतात की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.