समीर शिगवण/वांद्री:- रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथे अज्ञाताने पेट्रोल ओतून तीन गाड्या पेटवल्याची उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवार 14 मे रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या घटनेने उक्षीसारख्या ग्रामीण भागात अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. याबाबतची फिर्याद शिवम केळकर (उक्षी, सावंतवाडी) यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उक्षी सावंतवाडी येथे अज्ञाताने दोन दुचाकी आणि एक चारचाकीवर पेट्रोल ओतून 2 स्प्लेंडर आणि एक टोयाटो पेटवून दिल्याचे म्हटले आहे. यामध्ये दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत, तर चारचाकीचे किरकोळ नुकसान झाले आहे.
असे एकूण 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी रात्री 11.30 ते 12 वाजण्याच्या दरम्यान घडली. शिवम केळकर यांनी बुधवारी ग्रामीण पोलीस स्टेशन रत्नागिरी येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यामध्ये 30 हजाराचे नुकसान झाले आहे. दोन दुचाकीचे अंदाजे 10 हजार व 5 हजार असे नुकसान झाले आहे. तर टोयाटो गाडीचे वायर व इतर 15 हजाराचे नुकसान झाले आहे. असे एकूण 30 हजाराचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अज्ञातावर ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम 435 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.
सदर घटनेची माहिती मिळताच उक्षी गावचे उपसरपंच मिलिंद खानविलकर,पोलीस पाटील अनिल जाधव, सावंत गुरव वाडीतील सर्व ग्रामस्थ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गाड्यांना लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.