राजापूर:-राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील साखर श्रमिक पतपेढीवर दरोडा टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पतपेढी फोडून दीड कोटी रुपयांचे 200 तोळे सोने घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याच्या प्रकाराने राजापूर हादरले आहे.
दरम्यान शाखा अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना घडली. सकाळी शाखा उघडण्यासाठी आलेल्या शिपायाच्या शाखेचा कडी कोंडा तोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने संबंधितांना माहिती दिली. शाखा व्यवस्थापकाकडून नाटे सागरी पोलीस स्थानकात तात्काळ तक्रार दाखल करण्यात आली. घटनास्थळी स्थळीसागरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसहजिल्हा पोलीस अधीक्षक आणि ॲडिशनल एसपी सुद्धा दाखल
रत्नागिरी येथून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.
संध्याकाळी उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी होते. शाखेतील सोने ठेवण्याचे लॉकर फोडण्यात आले असून त्यातील जवळपास 200 तोळेचोरल्याची तक्रार झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुसरे पैशाचे लोकर मात्र तोडण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे.
सदरची शाखा ही श्री देव अंजनेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारा समोर असून फारशी वर्दळ या भागात नसते याचाच फायदा घेऊन पतपेढीफोडल्याचा संशयव्यक्त होत आहे जवळपास दीड कोटी रुपयाचा हा डल्ला असल्याची चर्चा सुरू आहे
पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे
राजापुरातील मिठगवाणे येथे पतपेढीवर दरोडा, दीड कोटी रुपयांचे 200 तोळे सोने लंपास
