चिपळूण:-ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर दगडाचा बांध घालून तो रहदारीसाठी बंद केल्याचा प्रकार तालुक्यातील कुडप-देवशेतवाडी येथे घडला. या प्रकरणी कुडप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रस्ता बंद करणाऱ्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन केशव शिर्के (कुडप-देवशेतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद ग्रामसेविका स्वप्ना तुकाराम जाधव (34, सावर्डे-नाभिकवाडी) यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, तालुक्यातील कुडप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात देवशेतवाडी ते बिबवी कातळ या रस्त्याची ग्रामपंचायत 23 नंबरला नोंद आहे. असे असताना हा रस्ता कुडप येथे राहणारा नितीन शिर्के याने 5 एप्रिलला रस्त्यावर दगडाचा बांध घालून बंद केला. हा प्रकार पुढे आल्यानंतर या प्रकरणी कुडप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका स्वप्ना जाधव यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिर्के याच्यावर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळुणात सार्वजनिक रस्ता बंद करणाऱ्यावर गुन्हा
