देवरुख:- मुलीचे व तरुणाचे प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरून मुलाच्या वडीलांनी तरूणाचा खुन केल्याची खळबळजनक घटना देवरूख नजीकच्या मोगरवणेवाडी येथे पाच वर्षापुर्वी घडली होती. या प्रकरणाचा निकाल मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने जाहीर केला असून आरोपी सुनिल गुरव (रा. फणसवणे गुरववाडी) याला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे गुरववाडी येथील महेंद्र सुनिल गुरव व कसबा येथील विशाखा अजय महाडीक यांचे प्रेमसंबंध होते. याची कुणकुण सुनिल गुरव यांना लागली होती. यानंतर विशाखा महाडीक ही बेपत्ता झाली होती. सर्वत्र शोधाशोध चौकशी करूनही थांगपत्ता न लागल्याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात विशाखा बेपत्ता असल्याची फीर्याद अजय महाडीक यांनी दाखल केली होती.सुनिल गुरव याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. यानुसार संगमेश्वर पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
या तपासाच्या दरम्यान सुनिल गुरव याने विशाखा महाडीक हीला देवरुख येथून रिक्षाने मोगरवणेवाडी येथे नेले. शीतपेयामध्ये गुंगीच्या गोळ्या घालून ते विशाखाला प्राशन करण्यास दिले. गुंगी आल्यानंतर ओढनीच्या सहाय्याने विशाखा महाडीक हा सुनिल गुरव याने खुन केल्याचे तपासामध्ये उघड झाले होते. यानुसार सुनिल गुरव याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनिल गुरव याने खुनाची कबुली देखील दिली होती. हे खुन प्रकरण 26 डिसेंबर 2018 रोजी घडले होते. याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी केला.
न्यायालयात हे प्रकरण सुरू होते. जिल्हा सत्र न्यायालयाने या खुन प्रकरणाचा निकाल मंगळवारी जाहीर केला. यामध्ये सुनिल गुरव याला जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रूपयांचा दंड सुनावला आहे. सरकारी वकील म्हणून प्रफुल्ल साळवी व कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून वर्षा चव्हाण व पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी काम पाहिले.
विशाखा महाडीक हा खुन करण्यासाठी सुनिल गुरव याने रिक्षेचा आधार घेतला होता. यामुळे रिक्षा चालकाला साक्षीदार म्हणून ठेवण्यात आले होते. या प्रकरणात साक्षीदाराची उटल सुलट तपासणी करण्यात आली. साक्षीदारांनी न डगमगता साक्ष दिली. सुनिल गुरव याला शिक्षा झाल्याने विशाखा महाडीक हिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. साक्षीदार म्हणून प्रसाद अपणकर, पवन भोई व अनिल पाटेकर यांनी महत्वाची भूमिका बजावली. या तीनही जणांचा देवरुख पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सत्कार केला.