दापोली:-दापोली तालुक्यातील करंजाणी येथील शिवाजी हायस्कूलसमोर अज्ञात दुचाकीस्वाराने प्रौढ पादाचाऱ्याला ठोकर दिल्याने तो जखमी झाला. याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात मंगेश रघुनाथ कालेकर (46, करंजाणी, मावळतवाडी) हे जखमी झाले असून त्यांनी याबाबतची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश कालेकर हे शनिवारी सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास करंजाणी ग्रामपंचायतीमधील लाईट बंद करण्यासाठी जात होते. शिवाजी हायस्कूलसमोरील रस्ता ओलांडत असताना दापोलीकडून येणाऱ्या अज्ञात मोटारसायकल चालकाने त्यांना जोरदार ठोकर दिली. या अपघातात कालेकर यांना दुखापत झाली. या अपघातानंतर मोटारसायकलस्वार अपघातस्थळी न थांबता पळून गेला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.
दापोली येथे अपघातात प्रौढ जखमी
