लांजा:-लांजा तालुक्यातील कुरचुंबे येथे मधमाशांच्या हल्ल्यामध्ये वृद्ध जखमी झाला. ही घटना सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडल़ी. प्रकाश शिवराम पाटोळे (65, रा.कुरचुंबे जाधववाडी त़ा लांजा) असे जखमीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा कुरचुंबे गावातील श्री गांगेश्वर मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने गावकऱ्याकडून साजरा करण्यात येत होत़ा. या कार्यक्रमासाठी 29 एप्रिल रोजी सकाळी प्रकाश पाटोळे व चंद्रकांत जाधव हे गेले होते. महाप्रसादाचे जेवण करण्यासाठी प्रकाश पाटोळे यांनी मंदिराजवळच चूल मांडली. चुल पेटविताना झालेल्या धुराने मधमाशांचे पोळे उठल़े. यातून निघालेल्या मधमाशांनी प्रकाश पाटोळे यांच्यावर हल्ला केला.
पाटोळे यांच्या सर्व अंगावर मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांना अत्यवस्थ वाटू लागल़े. यावेळी नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.